IND W vs AUS W 2nd ODI: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 258 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 63 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 259 धावा करायच्या आहेत. (हे देखील वाचा: Team India Schedule 2024: दक्षिण आफ्रिकेनंतर टीम इंडियाची 'या' सहा संघांविरुद्ध होणार मालिकेत लढत, पाहा वेळापत्रक)
Fifties from Phoebe Litchfield, Ellyse Perry and a cracking cameo by Alana King in the end gives Australia a decent total after India spill SEVEN catches in the field😬
👉https://t.co/lm9x7tLTsS pic.twitter.com/x6YYjqbT46
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)