IND-W vs AUS-W, 2nd T20 Live Score Update: दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला केवळ 130 धावांवर रोखले, कांगारुचा भेदक मारा
ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 130 धावा केल्या.
IND-W vs AUS-W, 2nd T20: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया महिला (IND vs AUS) संघांमधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 7 जानेवारी रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 130 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 31 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियातर्फे अॅनाबेल सदरलँड, किम गर्थ आणि जॉर्जिया वेअरहम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 131 धावा करायच्या आहेत.