IPL Points Table 2023: लीगच्या 35 व्या सामन्यात गुजरातने मुंबईचा केला 55 धावांनी पराभव, ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 152 धावा करू शकला आणि सामना गमावला.

GT Team

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा (GT vs MI) 55 धावांनी पराभव करत या स्पर्धेत पाचवा विजय नोंदवला. यासह गुजरात यंदाच्या मोसमात 10 गुण मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर 208 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ 152 धावा करू शकला आणि सामना गमावला. यासह गुजरात यंदाच्या मोसमात 10 गुण मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. तर पहिल्या स्थानावर चन्नई आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 6 गडी गमावून 207 धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने 56, डेव्हिड मिलरने 46 आणि अभिनव मनोहरने 42 धावा केल्या. अखेर राहुल तेवतियाने पाच चेंडूत 20 धावा करत संघाची धावसंख्या सहा गडी बाद 207 पर्यंत नेली. मुंबईकडून पियुष चावलाने दोन बळी घेतले. त्याच वेळी, ग्रीन वगळता उर्वरित गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)