DC vs CSK, IPL 2024 Match 13 Live Score Update: चेन्नई सुपर किंग्ज संघाला दुसरा धक्का, सलामीवीर रचिन रवींद्र पॅव्हेलियनमध्ये परतला
दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
DC vs CSK, IPL 2024, Match 13: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा (IPL 2024) 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आतापर्यंत त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याच वेळी, ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, दिल्लीने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. दिल्लीसाठी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 192 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चन्नईला पहिला धक्का लागला आहे. 18/2
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)