India Beat Australia: रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी केला पराभव, मालिका घेतली ताब्यात, गोलंदाजांनी केली कमाल
दोन्ही संघांमधील हा सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत मालिका ताब्यात घेतली.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज खेळवला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत मालिका ताब्यात घेतली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइसने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 154 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.