ICC World Cup 2023 Semifinals: आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने Eden Gardens आणि Wankhede Stadiums वर खेळवले जाऊ शकतात- Reports
त्यानंतर बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम हा एक पर्याय म्हणून पुढे आला.
भारत या वर्षाच्या शेवटी ऑक्टोबरमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे यजमानपदासाठी सज्ज आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या दरम्यान, काही अहवाल समोर आले आहेत ज्यामध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेचे उपांत्य सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित केले जाऊ शकतील. शेवटच्या चार सामन्यांसाठी वानखेडे (मुंबई) आणि चेपॉक (चेन्नई) मैदानांची चर्चा होती. त्यानंतर बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम हा एक पर्याय म्हणून पुढे आला आणि आता एक नवीन पर्याय म्हणून ईडन गार्डन्सचा विचार केला जात आहे. (हेही वाचा: सोशल मीडियावर Virat Kohli ठरला आयपीएल 2023 चा सर्वात लोकप्रिय खेळाडू; एमएस धोनीचा CSK सर्वात लोकप्रिय संघ- Reports)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)