ICC ODI World Cup 2023 Schedule: आयसीसी विश्वचषक 2023 चे वेळापत्रक आज होणार जाहीर, जाणून घ्या काय आहेत शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी मुंबईत सकाळी 11.30 वाजता वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर करेल. या कार्यक्रमाच्या निमंत्रणाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सर्व क्रिकेटप्रेमी आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC ODI World Cup 2023) वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयसीसी त्याची घोषणा 27 जून रोजी, म्हणजे आज स्पर्धा सुरू होण्याच्या 100 दिवस आधी करेल (World Cup Schedule Announcment). या मेगा इव्हेंटचे ड्राफ्ट शेड्यूल आधीच व्हायरल होत आहे. मसुद्याच्या वेळापत्रकानुसार, आयसीसी विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी मुंबईत सकाळी 11.30 वाजता वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर करेल. या कार्यक्रमाच्या निमंत्रणाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मीडिया निमंत्रणानुसार, हा कार्यक्रम मुंबईतील एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे होणार आहे. विश्वचषकाच्या प्रारूप वेळापत्रकानुसार, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मेगा स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. त्यानुसार, भारताची 11 ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तानशी लढत होईल आणि 15 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल.