ICC Women’s ODI Rankings: मिताली राजला धक्का देत Stafanie Taylor बनली आयसीसी नंबर-1 वनडे फलंदाज

तिने फलंदाजांच्या यादीत चार स्थानांची झेप घेतली आणि भारतीय कर्णधार मिताली राजला पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर धक्का दिला.

वेस्ट इंडिजचा कर्णधार स्टेफनी टेलर (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Women’s ODI Rankings: वेस्ट इंडीज (West Indies) कर्णधार स्टेफनी टेलरने (Stafanie Taylor) कूलिज येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) शानदार कामगिरी केल्यावर फलंदाज तसेच आयसीसी महिला वनडे खेळाडूंच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. तिने फलंदाजांच्या यादीत चार स्थानांची झेप घेतली आणि भारतीय कर्णधार मिताली राजला (Mihtali Raj) पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर धक्का दिला. दुसरीकडे टेलरने अष्टपैलूंच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला (Ellyse Perry) धक्का देत पहिला क्रमांक मिळवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)