ICC Reprimands Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम घेतला पंगा, आयसीसीने फटकारले
या दोघांमध्ये कोणतीही टक्कर झाली नसली तरी बुमराहच्या वागण्यावर ऑली पोप नाराज दिसला.
हैदराबाद कसोटी सामन्यात (first Test in Hyderabad) ऑली पोपने (Ollie Pope) शानदार फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना निराश केले. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या चेंडूवर ऑली पोप एकेरी धावा घेण्यासाठी धावला, त्यानंतर बुमराह जाणूनबुजून त्याच्या धावा घेण्याच्या आड आल्याचे पाहायला मिळाले, या दोघांमध्ये कोणतीही टक्कर झाली नसली तरी बुमराहच्या वागण्यावर ऑली पोप नाराज दिसला. आयसीसीने या वर्तनासाठी जसप्रीत बुमराहला फटकारले आहे. त्याचे वागणे अयोग्य असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)