Harry Brook Century: हैदराबादच्या हॅरी ब्रूकने झळकावले आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिले शतक, मार्करामचे अर्धशतक

दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर हॅरी ब्रूकने धडाकेबाज खेळी खेळताना अवघ्या 55 चेंडूत या मोसमातील पहिले शतक झळकावले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement