How To Watch PAK vs BAN, 2nd Test Live Streaming India: पाकिस्तान-बांगलादेश यांच्यात आजपासून खेळवला जाणार दुसरा कसोटी सामना, चाहते येथे पाहू शकता लाइव्ह

दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

PAK vs BAN (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात आजपासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, हा सामना टी स्पोर्ट्स आणि गाजी टीव्हीवर थेट प्रसारित केली जाईल. तर, पाकिस्तानमध्ये, हा सामना PTV स्पोर्ट्स आणि ASports वर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय या सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाइव्ह स्टीमिंग भारतात उपलब्ध होणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)