ENG Vs SA ICC World Cup 2023 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेने इंग्लडसमोर ठेवले 400 धावांचे मोठे लक्ष्य, हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅनसेनची झंझावाती खेळी
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लडसमोर 400 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रीझा हेंड्रिक्स 85, व्हॅन डर डुसेन 60, हेनरिक क्लासेन 109, आणि मार्को जॅन्सन सर्वाधिक धावा केल्या आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील (ICC Cricket World Cup 2023) दुसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या संबंधित सामन्यांमध्ये उलटफेरचे बळी ठरले होते. एकीकडे इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँडकडून पराभूत झाला. आता आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर इंग्लंडने आजचा सामना जिंकला तर ते टॉप-4 मध्ये स्थान मिळवेल. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लडसमोर 400 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रीझा हेंड्रिक्स 85, व्हॅन डर डुसेन 60, हेनरिक क्लासेन 109, आणि मार्को जॅन्सन 75 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर इंग्लडकडून रीस टोपली 3 सर्वाधिक विकेट घेतल्या. इंग्लडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 400 धावा करायच्या आहे.