Hardik Pandya मुळे Tilak Verma चे अर्धशतक हुकले, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले - Selfish कर्णधार; पहा ट्विट
सोशल मीडियावर चाहत्यांकडून हार्दिकला शिव्या दिल्या जात आहेत. त्याला सर्वात स्वार्थी खेळाडू देखील म्हटले जात आहे.
Hardik Pandya Trolled: भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजयी षटकार ठोकला. मात्र, या षटकाराचे कौतुक होण्याऐवजी सोशल मीडियावर तिरस्कारच व्यक्त होत आहे. या षटकारासाठी हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्याच्या षटकारांनी तिळक वर्माला (Tilak Verma) सलग दुसरे अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून हार्दिकला शिव्या दिल्या जात आहेत. त्याला सर्वात स्वार्थी खेळाडू देखील म्हटले जात आहे. हार्दिक आणि तिळक नाबाद परतले आणि भारताने सात गडी राखून वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. (हे देखील वाचा: तिसऱ्या टी-20 नंतर Suryakumar Yadav आणि Tilak Verma यांचा पहा मजेदार व्हिडिओ, BCCI ने केला शेअर)
हार्दिक पांड्याला चाहंत्यानी केलं प्रचंड ट्रोल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)