Hardik Pandya Trolls: 'हार्दिक भाई ढक्कन..' खचाखच भरलेल्या मैदानात लहान मुलांनी हार्दिक पांड्याची उडवली खिल्ली, व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबई विरुद्ध गुजरात (MI vs GT) यांच्यातील सामन्यातही हार्दिकला खचाखच भरलेल्या मैदानात चाहत्यांनी ट्रोल केले होते.
IPL 2024: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चाहत्यांच्या मनातून सरकताना दिसत आहे. डिसेंबरमध्ये मुंबई संघाने संघाला 5 वेळा करंडक जिंकून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) बाजूला सारून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. यानंतर पांड्याला ट्रोल आर्मीने पकडले आहे. मुंबई विरुद्ध गुजरात (MI vs GT) यांच्यातील सामन्यातही हार्दिकला खचाखच भरलेल्या मैदानात चाहत्यांनी ट्रोल केले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लहान मुले हार्दिकची खिल्ली उडवताना दिसत आहेत. (हे देखील वाचा: SRH vs MI, IPL 2024 8th Match Head To Head: हैदराबादच्या मैदानात पांड्या-पॅट कमिन्स आमनेसामने, पाहा हेड टू हेड आकडेवारी)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)