IND vs SA ICC World Cup 2023 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ 40 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, जडेजा-शमीला मिळाल्या दोन विकेट
टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने 101 नाबाद धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 37 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात, भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ आज कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने 101 नाबाद धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 50 षटकात 327 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाचवा मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 40/5
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)