CSK vs MI, Live Score Update: मुंबईचा अर्धा संघ तंबूत, नेहल वढेरा अर्धशतक करुन बाद

दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नंबर टू होण्यासाठी लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल.

CSK

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 49 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (MI vs CSK) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नंबर टू होण्यासाठी लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल. इतकंच नाही तर त्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यताही वाढणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबईचा रेकॉर्ड CSK पेक्षा मजबूत आहे. या मैदानावर दोन्ही संघांमधले गेले पाच सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला पाचवा मोठा धक्का बसला. मुंबई इंडियन्स संघाची धावसंख्या 123/5 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement