KKR vs DC, IPL 2024 Match 16th Live Score Update: दिल्लीचा निम्मा संघ तंबूत, सलग दुसरे अर्धशतर करुन बाद
दिल्ली कॅपिटल्सकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 273 धावा करायच्या आहेत.
KKR vs DC, IPL 2024 Match 16th: आयपीएल 2024 चा 16 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. दरम्यान, कोलकाताने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने दिल्लीसमोर 272 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक 85 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 273 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला पाचवा धक्का लागला आहे. 126/5
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)