LSG vs GT, IPL 2023 Match 30 Live Score Update: गुजरात टायटन्स संघाला दुसरा धक्का, सलामीवीर वृद्धिमान साहा बाद
दोन्ही संघांमधील हा सामना लखनौचे होम ग्राऊंड भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. लखनौ संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 30वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौचे होम ग्राऊंड भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. लखनौ संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरातने पाचपैकी तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. दोन्ही संघांचा नेट रनरेट खूप चांगला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. सलामीवीर ऋद्धिमान साहा 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. गुजरात टायटन्स संघाचा स्कोअर 72/2.