IPL 2023 Point Table: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून केला पराभव, ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स संघाचा नऊ गडी राखून पराभव केला.

GT

आयपीएलच्या 48व्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. शुक्रवारी (5 मे) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सने त्यांचा नऊ गडी राखून पराभव केला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा संघ 17.5 षटकांत 118 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात गुजरातने 13.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 119 धावा करून सामना जिंकला. गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. त्याचा हा मोसमातील सातवा विजय आहे. त्यांचे आता 10 सामन्यांत 14 गुण झाले आहेत. गुजरातचा संघ केवळ तीन सामने हरला आहे. दुसरीकडे, या पराभवानंतर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. त्याचे 10 सामन्यांत 10 गुण आहेत. राजस्थानचे पाच विजय आणि पाच पराभव झाले आहेत.

ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)