PBKS vs GT, IPL 2024 37th Match Live Score Update: गुजरातला तिसरा धक्का बसला, डेविड मिलर चार धावा करून बाद
पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. गुजरातकडून रविश्रीनिवासन साई किशोरने सर्वाधिक चार बळी घेतले.
PBKS vs GT, IPL 2024 37th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) यांच्यात मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून गुजरातसमोर 143 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 35 धावा केल्या. गुजरातकडून रविश्रीनिवासन साई किशोरने सर्वाधिक चार बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स संघाला 20 षटकात 143 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल 35 करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. गुजरात टायटन्स संघाचा स्कोअर 78/3
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)