GT vs MI, IPL 2024 5th Match Live Score Update: गुजरातने मुंबईला दिले 169 धावांचे लक्ष्य, जसप्रीत बुमराहची उत्कृष्ट गोलंदाजी
दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. गुजरात आणि मुंबई यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत.
GT vs MI, IPL 2024 5th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ आपला सलामीचा सामन्याने चांगली सुरुवात करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. गुजरात आणि मुंबई यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. दरम्यान, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना गुजरातने मुंबईसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 45 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 169 धावा करायच्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)