IPL 2024 Points Tables: गुजरातने पंजाबचा तीन गडी राखून केला पराभव, पाहा पॉइंट टेबलची स्थिती
पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु संघाची शीर्ष फळी डळमळीत झाल्याचे दिसून आले. पंजाबचा संपूर्ण संघ 142 धावांत गडगडला. गुजरात टायटन्सला विजयासाठी 143 धावा करायच्या होत्या, जे त्यांनी 5 चेंडू शिल्लक असताना गाठले.
PBKS vs GT, IPL 2024 37th Match: आयपीएलमध्ये (IPL 2024) रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव (Gujarat Beat Punajb) केला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु संघाची शीर्ष फळी डळमळीत झाल्याचे दिसून आले. पंजाबचा संपूर्ण संघ 142 धावांत गडगडला. गुजरात टायटन्सला विजयासाठी 143 धावा करायच्या होत्या, जे त्यांनी 5 चेंडू शिल्लक असताना गाठले. गुजरात टायटन्स 3 गडी राखून विजयी झाले. या विजयानंतर गुजरातने पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर, पंजाब नव्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: PBKS vs MI सामन्यादरम्यान सॅम कुरन चाहत्याने दिला 'भारत माता की जय'चा नारा, पाहा व्हिडिओ)
पाहा पॉइंट टेबलची स्थिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)