KKR vs GT IPL 2023: गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून केला पराभव, विजय शंकर आणि डेव्हिड मिलरची जबरदस्त खेळी
दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाता येथील होम ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा सात विकेटने पराभव केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 39 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाता येथील होम ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा सात विकेटने पराभव केला आहे. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 179 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने सर्वाधिक 81 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने 17.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. गुजरात टायटन्सकडून विजय शंकरने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)