GT vs RR, IPL 2022 Final: राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जेतेपदाच्या सामन्यासाठी पाहा दोंघांचा प्लेइंग XI
GT vs RR, IPL 2022 Final: आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जेतेपदाच्या सामन्यासाठी रॉयल्सच्या ताफ्यात कोणताही बदल झालेला नाही. तर गुजरातने लॉकी फर्ग्युसनचा अल्झारी जोसेफच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
GT vs RR, IPL 2022 Final: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील आयपीएल 2022 चा अंतिम (IPL Final) सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ‘आर या पार’च्या लढतीत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)