GT vs PBKS Live Streaming Online: आज मोहालीत पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स रंगणार जबरदस्त सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाईव्ह

तर, नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली आहे.

PBKS vs GT (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आजही जबरदस्त सामना रंगणार आहे. आज मोहालीत पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. तर, नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये निकराची लढत झाली आहे. गुजरात टायटन्सचा हा दुसरा मोसम आहे, गेल्या मोसमात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते, त्यात पंजाबने एका सामन्यात विजय मिळवला, तर गुजरातने दुसरा सामना जिंकला. आज दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. हा सामना तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमावर पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या