Asia Cup 2022: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, विश्वचषकापूर्वी रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया (See Photo)

Ravindra Jadeja ने इंस्टाग्रामवर त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीबद्दल एक पोस्ट शेअर केली

Ravindra Jadeja (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधून बाहेर पडला. या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी जडेजाने आपल्या गुडघ्याबाबत एक मोठा अपडेट दिला आहे. या स्टार अष्टपैलू खेळाडूने मंगळवारी (6 सप्टेंबर) त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीबद्दल एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने एक फोटो शेअर केला की त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली (Successful Knee Surgery) आणि तो लवकरच बरा होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindrasinh jadeja (@ravindra.jadeja)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)