IPL 2024 पूर्वी Gautam Gambhir ने तिरुपती बालाजी मंदिराला दिली भेट, घेतले दर्शन (Watch Video)
गौतम गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले आहे. तो पुन्हा एकदा या संघात सामील होईल आणि त्याच्या यशासाठी रणनीती तयार करेल.
IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग सीझन 17 सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत, सर्व संघांनी सराव सुरू केला आहे. केकेआर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपल्या संघात सामील होण्यापूर्वी पत्नीसह तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. गौतम गंभीर याआधी लखनौ सुपर जायंट्सचा 2 सीझनसाठी मेंटर होता, पण या सीझनसाठी तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर म्हणून काम करेल. क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी राजकारणही सोडले असून, यावेळी ते लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. गौतम गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले आहे. तो पुन्हा एकदा या संघात सामील होईल आणि त्याच्या यशासाठी रणनीती तयार करेल. तो लवकरच केकेआर संघात सामील होणार आहे. (हे देखील वाचा: WPL 2024 Point Table: हरमनप्रीत कौरचे तुफान, गुजरातला पराभूत करुन प्लेऑफमध्ये मिळवले स्थान, येथे पाहा पॉइंट टेबल)
पाहा व्हिडिओ
Tirupati Balaji! 🙏🙏 pic.twitter.com/XwUZlYDpFy
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) March 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2024 09:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

