WPL 2024 Point Table: महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातील 16 वा सामना शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने हंगामातील पाचवा विजय नोंदवून अंतिम फेरीचे किंवा एलिमिनेटरचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. याशिवाय पहिले सलग चार सामने गमावलेल्या गुजरात जायंट्सने शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केले होते, मात्र आता गुजरातकडून पराभूत झाल्याने संघ जवळपास बाद झाला आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ या विजयासह अव्वल स्थानावर आला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार खेळी करत नाबाद 95 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.
येथे पाहा पॉइंट टेबलची परिस्थिती
Mumbai Indians seal the Top 3 spot in WPL 2024 with a thrilling win over Gujarat Giants 👌#Cricket #WPL2024 #MIvGG pic.twitter.com/FXKXXEGDV3
— Sportskeeda (@Sportskeeda) March 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)