ENG vs AUS 4th Test Drawn: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित, सामन्यात पावसाने आणला व्यत्यय

सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर अखेर पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. पावसाने इंग्लंड संघाला मोठा धक्का दिला आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर होता.

ENG vs AUS (Photo Credit -Twitter)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात मँचेस्टरमध्ये खेळली गेलेली अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णित राहिली आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही. दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर अखेर पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. पावसाने इंग्लंड संघाला मोठा धक्का दिला आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर होता. आता पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाला तरी मालिका 2-2 अशी बरोबरीत राहील. अशा स्थितीत त्याचा अॅशेस ट्रॉफीवरील ताबा कायम राहील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement