Zimbabwe क्रिकेट संघाचे माजी कर्णधार Heath Streak यांनी दिली भ्रष्टाचाराची कबुली, ICC ने सुनावली मोठी शिक्षा

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे माजी कर्णधार Heath Streak यांच्यावर आयसीसीने 8 वर्षांसाठी बंदी घातली आहे. स्ट्रीकवर भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली दिल्यानंतर आयसीसीने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. झिम्बाब्वेचे एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रीक 2017 ते 2018 दरम्यान अनेक सामन्यांमध्ये संशयाच्या भोवऱ्यात होते.

ICC (Photo Credits: File Image)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे (Zimbabwe Cricket Team) माजी कर्णधार Heath Streak यांच्यावर आयसीसीने 8 वर्षांसाठी बंदी घातली आहे. स्ट्रीकवर भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली दिल्यानंतर आयसीसीने (ICC) त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. झिम्बाब्वेचे एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रीक 2017 ते 2018 दरम्यान अनेक सामन्यांमध्ये संशयाच्या भोवऱ्यात होते. प्रशिक्षक म्हणून त्यांच्यावर अनेक गटात भ्रष्टाचार विरोधी कोडचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. आयसीसी अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याचे पाच आरोप मान्य केल्यावर झिम्बाब्वेचे माजी कर्णधार स्ट्रिकवर आठ वर्षांसाठी सर्व क्रिकेटवर बंदी घालण्यात आली आहे. आता स्ट्रीक 8 वर्ष कोणत्याही क्रिकेट कार्यात भाग घेऊ शकणार नाही. सट्टेबाजीचा प्रचार केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now