RCB vs DC, IPL 2024 Live Score Update: दिल्लीला 86 धावांवर पाचवा धक्का, 29 धावा करून होप आऊट

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने दिल्लीसमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रजत पाटीदारने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि रसीख दार सलाम यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

RCB

RCB vs DC, IPL 2024 62nd Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 62 वा (IPL 2024) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. आजचा सामनाही नक्कीच बाद फेरीचा असेल. हा सामना जो हरेल तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीने दिल्लीसमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रजत पाटीदारने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि रसीख दार सलाम यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला पाचवा मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्कोअर 90/5.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now