TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्समध्ये दाखल, 6 कोटी 5 लाखात घेतले विकत
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. या मेगा लिलावाचा आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात. ऋषभ पंतने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व विक्रम मोडले, जिथे लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरवर 26.75 कोटी रुपये, तर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेगा लिलावासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दरम्यान, वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेचा राजस्थान रॉयल्सने 6.5 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समावेश केला आहे.
Tushar Deshpande SOLD to @rajasthanroyals 🙌🙌
He's acquired for INR 6.5 Crore ⚡️⚡️#TATAIPLAuction | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2402 05:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

