IND vs ENG 4th Test Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली, भारताकडून आकाश दीपचे पदार्पण, द्रविडने दिली कॅप
टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. हैदराबादमधील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. यानंतर विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये भारतीय संघ विजयी झाला.
IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) आजपासून सुरुवात होणार आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. हैदराबादमधील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. यानंतर विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये भारतीय संघ विजयी झाला. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चौथ्या कसोटीत दोन्ही संघ 'या' दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरले आहेत.
प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टली, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)