IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2 Toss Update: भारताविरुद्ध इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी केले अमंत्रित

याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच आजचा विजयी संघ 29 जून रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.

IND vs ENG (Photo Credit - Twitter)

IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात कांगारूंना पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत ब्रिटीशांशी लढणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच आजचा विजयी संघ 29 जून रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले