PAK vs ENG 2nd Test Day 3 Live Update: इंग्लंडचा पहिला डाव 291 धावांवर आटोपला, बेन डकेटचे शतक; साजिद खानने घेतल्या 7 विकेट

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 67.2 षटकांत सर्वबाद 291 धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी पहिल्या डावात बेन डकेटने 129 चेंडूत 114 धावा केल्या. ज्यात त्याने 16 चौकार मारले.

ENG vs PAK (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आहे. हा सामना मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 239 धावा केल्या होत्या. दरम्यान, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 67.2 षटकांत सर्वबाद 291 धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी पहिल्या डावात बेन डकेटने 129 चेंडूत 114 धावा केल्या. ज्यात त्याने 16 चौकार मारले. याशिवाय जो रूटने 34 आणि ऑली पोपने 29 धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना साजिद खानने 26.2 षटकात 111 धावा देत 7 बळी घेतले. तर नोमान अलीने 3 बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement