ENG vs PAK 1st Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 ची केली घोषणा, बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर
स्टोक्सला श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिकाही खेळता आली नाही. इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. ऑली पोप पुन्हा एकदा इंग्लंडचा कर्णधार असेल.
England National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ (ENG vs PAK) यांच्यात 7 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना मुलतान येथे खेळवला (Multan Test) जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. स्टोक्सला श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिकाही खेळता आली नाही. इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. ऑली पोप पुन्हा एकदा इंग्लंडचा कर्णधार असेल. या सामन्यात वेगवान गोलंदाज ब्रेडेन कारसे पदार्पण करताना दिसणार आहे. जॅक लीच आणि शोएब बशीर फिरकी गोलंदाजी सांभाळतील. सलामीवीर जॅक क्रॉलीचेही संघात पुनरागमन झाले आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कारसे, जॅक लीच आणि शोएब बशीर.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)