GT vs MI, IPL 2023 Qualifier 2 Toss Update: पावसामुळे दुसरा क्वालिफायर सामना 8 वाजता होणार सुरु तर 7.45 होणार नाणेफेक
दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) दुसरा क्वालिफायर आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad's Narendra Modi Stadium) स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा असेल. यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि चेन्नईसोबत खेळेल. पराभूत संघाचा प्रवास तिथेच संपेल. दरम्यान, पावसामुळे दुसरा क्वालिफायर सामना 8 वाजता सुरु होणार तर 7.45 नाणेफेक होईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)