IND vs PAK 1st Test: पर्थ कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानसाठी दुहेरी संकट, आयसीसीने संघावर केली कारवाई

पर्थ कसोटीत पाकिस्तानच्या पराभवानंतर आयसीसीने पाकिस्तान संघावर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणखी अडचणीत सापडला आहे.

IND vs PAK 1st Test: पर्थ कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तानसाठी दुहेरी संकट, आयसीसीने संघावर केली कारवाई

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत पाकिस्तानला (AUS Beat PAK) पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय नोंदवत पाकिस्तानचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, ही मालिका WTC 2025 च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असणार आहे. आता आयसीसीने पाकिस्तानला आणखी एक झटका दिला आहे. पर्थ कसोटीत पाकिस्तानच्या पराभवानंतर आयसीसीने पाकिस्तान संघावर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणखी अडचणीत सापडला आहे. आयसीसीने आचारसंहितेच्या कलम 2.22 मध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या संघाने एका षटकासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला तर त्या संघाच्या सर्व खेळाडूंना प्रति षटक 5 टक्के दराने दंड आकारला जाईल. पाकिस्तानने दोन षटके उशीर केल्याने खेळाडूंवर 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या कलम 16.11.2 नुसार, प्रत्येक उशीरा ओव्हरसाठी पॉइंट टेबलमधून एक गुण वजा केला जाईल. पाकिस्तानने दोन षटके उशिरा टाकली, त्यामुळे त्यांना 2 गुणांचा दंड आकारण्यात आला आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 2nd ODI Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळत बदल, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement