Fastest Fifty In SA20 History: डोनोव्हन फेरेरियाने इतिहास रचला, SA20 स्पर्धेतील ठोकले सर्वात जलद अर्धशतक
डोनोव्हन फेरेरियाने जॉबर्ग सुपर किंग्जकडून तुफानी खेळी खेळली. डोनोव्हन फेरेरियाने संपूर्ण मैदानात फटकेबाजी केली. डोनोव्हन फेरेरियाने 20 चेंडूत 56 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. डोनोव्हान फेरेरियाने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
SA 20 चा दुसरा सीझन दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. या स्पर्धेत शनिवारी जोबर्ग सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्जने प्रिटोरिया कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात डोनोव्हान फेरेरियाने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आणि SA20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. डोनोव्हन फेरेरियाने जॉबर्ग सुपर किंग्जकडून तुफानी खेळी खेळली. डोनोव्हन फेरेरियाने संपूर्ण मैदानात फटकेबाजी केली. डोनोव्हन फेरेरियाने 20 चेंडूत 56 धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. डोनोव्हान फेरेरियाने अवघ्या 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. SA20 स्पर्धेच्या इतिहासातील हे सर्वात जलद अर्धशतक आहे. (हे देखील वाचा: Keshav Maharaj wishes For Ram Mandir: दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराजने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त शुभेच्छा दिल्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)