Australia Beat Scotland 1st T20I: हेड आणि मार्शची झंझावाती खेळी, 7 विकेट राखुन स्कॉटलंडचा केला पराभव; नावावर केला 'विश्वविक्रम'

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकादरम्यान वेस्ट इंडिज संघाने पॉवरप्लेमध्ये 92 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले, जे ऑस्ट्रेलियाने अवघ्या तीन विकेट गमावून 9.4 षटकांत पूर्ण केले.

Travis Head And Mitchell Marsh (Photo Credit - X)

AUS vs SCO 1st T20I: स्कॉटलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पॉवरप्लेदरम्यान ऑस्ट्रेलियाने विश्वविक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया टी-20 इंटरनॅशनलमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाने बुधवारी वेस्ट इंडिजचा विक्रम मोडला. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकादरम्यान वेस्ट इंडिज संघाने पॉवरप्लेमध्ये 92 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले, जे ऑस्ट्रेलियाने अवघ्या तीन विकेट गमावून 9.4 षटकांत पूर्ण केले. 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाला ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श धाकड सुरुवात करुन दिली. मात्र, पदार्पणाचा सामना खेळत असलेला फ्रेझर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. ट्रॅव्हिस हेडने पॉवरप्लेमध्ये 22 चेंडूत 73 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तर मिचेल मार्शने 11 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now