DC vs KKR, IPL 2023 Match 28 Live Update: दिल्लीने कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, इशांत शर्माचे पुनरागमन
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आपली स्थिती सुधारायची आहे
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 27 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आपली स्थिती सुधारायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघ
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, अॅनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार.
कोलकाता नाइट रायडर्स: जेसन रॉय, लिटन दास (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), मनदीप सिंग, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.