PK vs DC, IPL 2024 2nd Match Toss Update: दिल्लीने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी निवडली, पंतचे मैदानात पुनरागमन
पंजाब संघाचे हे नवे घरचे मैदान आहे ज्यावर संघ खेळणार आहे.
PK vs DC, IPL 2nd Match: आज आयपीएलमध्ये डबल हेडर आहे. आयपीएल 2024 चा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PK vs DC) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे खेळवला जात आहे. पंजाब संघाचे हे नवे घरचे मैदान आहे ज्यावर संघ खेळणार आहे. यापूर्वी मोहाली हे पंजाब संघाचे होम ग्राउंड होते. या सामन्यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत तब्बल 15 महिन्यांनंतर मैदानात परतत आहे. दरम्यान, पंंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)