DC vs SRH, IPL 2024 35th Match Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यांत आज होणार लढत, येथे पाहू शकता लाइव्ह सामना
सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ 20 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता एकमेकांविरुद्ध खेळतील. सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल. (हे देखील वाचा: LSG Beat CSK: लखनौने चेन्नईचा आठ गडी राखून केला पराभव, केएल राहुल आणि डी कॉक यांनी झळकावले अर्धशतके)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)