WPL 2024 Points Table: दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा दारुण केला पराभव, जाणून घ्या पॉइंट टेबलमधील नवीनतम स्थिती
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी गमावून 192 धावा केल्या. या सामन्यात जेमिमाने दिल्लीकडून सर्वाधिक 69 धावांची खेळी खेळली. याशिवाय मेग लॅनिंगने 53 धावा केल्या होत्या. 192 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ 8 गडी गमावून 163 धावा करू शकला.
MI vs DC WPL 2024: महिला प्रीमियर लीग 2024 च्या 12 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी गमावून 192 धावा केल्या. या सामन्यात जेमिमाने दिल्लीकडून सर्वाधिक 69 धावांची खेळी खेळली. याशिवाय मेग लॅनिंगने 53 धावा केल्या होत्या. 192 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ 8 गडी गमावून 163 धावा करू शकला. मुंबईकडून फलंदाजी करताना अमनजोत कौरने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. दिल्लीकडून गोलंदाजी करताना जेस जोनासेनने सर्वाधिक 3 बळी घेतले. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठ्याप्रमाने फेरबद्दल पाहाला मिळाले. (हे देखील वाचा: WPL 2024 Shabnim Ismail Fastest Delivery: महिला प्रीमियर लीगमध्ये रचला गेला सर्वात मोठा विक्रम, मुंबई इंडियन्सची खेळाडू शबनिम इस्माईलने केली मोठी कामगिरी)
पाहा पॉइंट टेबलमधील नवीनतम स्थिती