Delhi Capitals Jersey in WPL 2024: दिल्ली कॅपिटल्स संघाने जर्सीचे केले अनावरण, पाहा महिला संघाची कशी आहे जर्सी
महिला प्रीमियर लीग 2024 चा पहिला सामना 23 फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.
Delhi Capitals Jersey in WPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) शुक्रवारी महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी (WPL 2024) आपल्या महिला संघाच्या जर्सीचे अनावरण केले. या कार्यक्रमाला संघातील बहुतांश खेळाडू उपस्थित होते. महिला प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती पुढील शुक्रवारपासून सुरू होत आहे. परदेशी खेळाडूंनीही आपल्या संघात सामील होऊन सराव सुरू केला आहे. महिला प्रीमियर लीग 2024 चा पहिला सामना 23 फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा बंगळरूमध्ये खेळवला जाणार आहे. याआधी उद्घाटन सोहळा होऊ शकतो. महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ खेळणार आहेत. (हे देखील वाचा: Sachin Tendulkar visited Taj Mahal: व्हॅलेंटाइनडेच्या दुसऱ्या दिवशी सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह आग्रा ताजमहालला दिली, फोटो व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)