IPL 2024 पूर्वी David Warner झाला जखमी, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

डेव्हिड वॉर्नर पाठदुखीची तक्रार करत असून त्याच्या मांडीत दुखत असल्याचेही वृत्त आहे. तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. डेव्हिड वॉर्नरला दुखापतीतून सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल. पुढील महिन्यापासून आयपीएल 2024 सुरू होत आहे.

David Warner Injury: ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे, याआधी झालेल्या दोन्ही टी-20 सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने अजेय आघाडी घेतली आहे. डेव्हिड वॉर्नर पाठदुखीची तक्रार करत असून त्याच्या मांडीत दुखत असल्याचेही वृत्त आहे. तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. डेव्हिड वॉर्नरला दुखापतीतून सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल. पुढील महिन्यापासून आयपीएल 2024 सुरू होत आहे, डेव्हिड वॉर्नरने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी स्वीकारली होती. यावेळी देखील तो या संघाचा एक भाग आहे, ऋषभ पंत या वर्षापासून कर्णधार म्हणून पुनरागमन करत आहे, त्यामुळे वॉर्नर उपकर्णधार राहील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement