क्रिकेटर Yashasvi Jaiswal चा दमदार षटकार; स्टेडियमच्या बाहेर गेला चेंडू (Watch Video)
20 वर्षीय यशस्वी जैस्वालने षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने जेव्हा षटकार मारला तेव्हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा यशस्वी जैसवाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रणजीनंतर त्याने इराणी चषकात उत्तम खेळ खेळला आणि आता मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी, जैसवालच्या शानदार खेळीमुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अ गटातील लीग सामन्यात गतविजेता रणजी चॅम्पियन मध्य प्रदेशचा 8 गडी राखून पराभव केला.
20 वर्षीय यशस्वी जैस्वालने षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने जेव्हा षटकार मारला तेव्हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. जैस्वाल याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या षटकाराचा व्हिडिओही शेअर केला आहे. या सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वालने मध्य प्रदेशचा अर्धवेळ गोलंदाज शुभम शर्माच्या चेंडूवर असा जबरदस्त षटकार ठोकला की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)