IPL 2023 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कॉनवेची मोठी झेप, पहिल्या पाच फलंदाजांची पहा यादी

कॉनवेने पंजाबविरुद्ध 92 धावांची शानदार खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली. 422 धावांसह फॅफ डुप्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Davon Canway

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 41व्या सामन्यात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा गोंधळ उडाला आहे. सीएसकेचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे 414 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कॉनवेने पंजाबविरुद्ध 92 धावांची शानदार खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली. 422 धावांसह फॅफ डुप्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 9 सामन्यात 354 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिल आहे, ज्याने 8 सामन्यात 333 धावा केल्या आहेत. विराट कोहली 333 धावांसह पहिल्या पाचमध्ये तळाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now