PAK vs NZ, CWC 2023 Warm-Up Live Streaming: विश्वचषकाआधी होणार रंगीत तालीम, सराव सामन्यात पाकिस्तान - न्युझीलंड आमनेसामने; कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात दिवसातील तिसरा सराव सामना खेळवला जाईल.

PAK vs NZ (Photo Credit - Twitter)

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) आता फक्त एक आठवडा बाकी आहे. विश्वचषक स्पर्धेत भाग घेणारे बहुतांश संघ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात आले आहेत. शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी तीन सराव सामने होतील. शकीब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा सामना गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेशी होईल, तर अफगाणिस्तानचा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेशी होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात दिवसातील तिसरा सराव सामना खेळवला जाईल. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सराव सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी हिंदीवर थेट प्रसारित केला जाईल. तुम्ही Disney+Hotstar अॅपवर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सराव सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)