Cheteshwar Pujara vs Shaheen Afridi: काउंटी क्रिकेटमध्ये शाहीन आफ्रिदीशी भिडला चेतेश्वर पुजारा, दिग्गज फलंदाजाने जबरदस्त षटकार मारून धडा शिकवला (Watch Video)

Cheteshwar Pujara vs Shaheen Afridi: भारतीय कसोटी संघातून बाहेर असलेला चेतेश्वर पुजाराचा काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ सुरूच आहे. आत्तापर्यंत तीन सामन्यांमध्ये पुजाराने 132.75 च्या सरासरीने 531 धावा केल्या आहेत. मिडलसेक्सविरुद्ध चौथा सामना खेळत पुजाराचा सामना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी झाला. आणि पुजाराने आफ्रिदीच्या चेंडूवर अप्पर कट शॉटच्या मदतीने षटकार ठोकला.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit-Getty Images)

Cheteshwar Pujara vs Shaheen Afridi: भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) चाहत्यांना या दोन देशांमधील रेड बॉल क्रिकेट पाहायचं असतं. काउंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) भारताचा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आमनेसामने आल्याने चाहत्यांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुजाराचा काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ सुरूच आहे. आत्तापर्यंत तीन सामन्यांमध्ये पुजाराने 132.75 च्या सरासरीने 531 धावा केल्या आहेत. पुजारा मिडलसेक्स (Middlesex) विरुद्ध चौथा सामना खेळत असून यादरम्यान त्याचा सामना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी झाला. आणि पुजाराने आफ्रिदीच्या वेगवान चेंडूवर अप्पर कट शॉटच्या मदतीने षटकार ठोकला. पुजारा आणि शाहीन आफ्रिदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement